10 रुपयांचे नाणे सर्व छोट-मोठे व्यापारी, ग्राहक आणि बँकांनी स्वीकारावे – जितेश कटारिया

करमाळा प्रतिनिधी

सध्या बाजारात 10 रुपयांच्या नोटांचा तुटवडा जाणवत असून ज्या नोटा बाजारात येत आहेत त्या फाटक्या किंवा चिटकवलेल्या येत आहे.

त्यातच गेल्या काही वर्षापूर्वीचा अफवांमुळे 10 रुपयांचे नाणे सर्वत्र उपलब्ध आहेत परंतु दहा रुपयाचे नाणे स्वीकारण्यास सर्वत्र नकार मिळत असून, हा राजमुद्रेचा अवमान आहे. प्रशासनाने देखील याकडे डोळेझाक केली आहे. आता नागरिकही हे नाणे एकमेकांकडून स्वीकारत नसल्याने नाणे चलनातून बाद झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दहा रुपयाचे नाणे राज्यासह, महाराष्ट्रातील बहुतांश भागात चलनात असल्याचे दिसून येते, मात्र करमाळा तालुक्यात दहा रुपयाची नाणी कोणी स्वीकारण्यास तयार नाही. हे नाणे बंद झाल्याचे कोणतेही आदेश रिझर्व्‍ह बँक ऑफ इंडियाने दिले नसल्याचे वारंवार सांगितल्याचे बँकांचे म्हणणे आहे. मात्र शहरातील व परिसरातील दुकानदार सदर नाणे स्वीकारण्यास नकार देतात तर हे नाणे त्यांच्याकडून नागरिक स्वीकारत नसल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.

अनेकांकडे दहा रुपयाचे नाणे असूनही ते तसेच पडून आहेत. काही जणांनी तर ही नाणी चक्क मोडीत दिल्याचे प्रकार पहावयास मिळतात. राजमुद्रेचा सुरू असलेल्या अवमानास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दहा रुपयाच्या नाण्यांचे तालुक्यात चलनच बंद झाले आहे. दहा रुपयाचे नाणे चलनात असून ते सर्व दुकानदारांनी व ग्राहकांनी स्वीकारावे, अशा सूचनांचे फलक सर्व छोटे मोठे दुकानदार, फेरीवाले-पथारीवाले, बँक व इतर संस्थांनी आपापल्या जागेत लावल्यास ग्राहकांमधील गैरसमज दूर होईल.

तसेच दहा रुपयाची नाणी हे रिझर्व बँकेने जारी केलेले कायदेशीर टेंडर आहे आणि ते स्वीकारण्यास नकार देणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

तरी तालुक्यातील सर्व छोटे – मोठे दुकानदार, ग्राहक आणि बँकांनी 10 रुपयांच्या नाणे स्वीकारावे असे आवाहन भाजपा व्यापार आघाडी चे शहराध्यक्ष जितेश कटारिया यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *