
वीजे संदर्भात मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले
करमाळा प्रतिनिधी
बोरगांव ग्रामपंचायत च्या वतीने पोटेगांव सब स्टेशन वरून वितरीत होणारा थ्री फेज व भगीरथचा वीज पुरवठा पुर्ण दाबाने मिळण्यासाठी महावितरण उपअभियंता करमाळा यांना निवेदन देताना संजय घोलप मनसे तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे.

विनय ननवरे सरपंच बोरगांव, अतुल फंड नगरसेवक क.न.प, शहाजी ठोसर ग्रामपंचायत सदस्य करंजे, प्रशांत गिड्डे मनसे जिल्हाध्यक्ष यांनी साहेबांना फोन द्वारे विनंती केली. या विनंतीला अनुसरून बोलताना जाधव साहेब यांनी उद्या पासुन 6 तास पुर्ण दाबाने पोटेगांव सबस्टेशन ला वीजपुरवठा होईल असा विश्वास दिला आहे.

