
साद जमादार याने केला पहिला रोजा
करमाळा प्रतिनिधी
इस्लाम धर्मात पवित्र समजणारा रमजान महीन्याची भर उन्हाळ्यात सुरूवात झाली असुन या पवित्र आणी प्रेम, संयम शांततेच प्रतिक असणारा रमजान महीन्यातील पहिला रोजा (उपवास) साद आसिफ जमादार यांनी केला असून तो करमाळा नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीत शिकत आहे. कमी वयात पहिला रोजा केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनंदा जाधव व सर्व शिक्षक वर्गाकडुन साद जमादार याचे स्वागत करण्यात आले. साद हा करमाळा नगरपरिषदेचे माजी नगरसेविका बानु फारूक जमादार यांचा नातु असुन लहान वयात पहिला रोजा केल्याबद्दल त्याचे कौतुक होत आहे.



