गावा मधून अमर जवान यात्रा काढण्यात आली.
करमाळा प्रतिनिधी
झरे येथे सकाळी 7.20 मिनीटांनी मेजर यांना गावात आणण्यात आले. त्या नंतर गावा मधून अमर जवान यात्रा काढण्यात आली. या मध्ये गावातील महिला पुरुष व लहान मुले सर्व उपस्थित होते. या नंतर मेजर नायब सुभेदार ज्ञानेश्वर बापू बागल यांना मेजर सुभेदार भूषण बापू बागल यांनी अग्नी दिला. या वेळी आर्मी बटालियन यांनी सर्व प्रथम मानवंदना दिली. यानंतर
आमदार संजय मामा शिंदे, तहसीलदार समीर माने, करमाळा पोलीस निरीक्षक गुंजवटे साहेब, बीभीषण जाधव, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, ह.भ.प. बापूराव बागल, ह.भ.प. बाबुराव हिरडे, ह.भ.प. विठ्ठल पाटील, ह.भ.प. प्रकाश महाराज दंडे, ह.भ.प. प्रदीप महाराज डेरे, ह.भ.प. दिगंबर महाराज पवार, ह.भ.प. रुंगे महाराज शेटफळ, हरेकृष्ण भक्त
भाऊसाहेब जाधव, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, माजी सरपंच प्रशांत पाटील, शिवसेना संपर्क प्रमुख बापूसाहेब मोरे, नारायण शेट अमृळे, सरपंच भारत मोरे, चंद्रकांत सरडे, शंभूराजे जगताप, पृथ्वीराज पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे, भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे, सतीश बोराटे, चंद्रशेकर जोगळेकर, शिवाजी पिसाळ, आदिनी पुष्प चक्र अर्पण केले. अंतविधी सकाळी 9.30 ला पार पडले.