पंचायत समिती करमाळा अंतर्गत गुढीपाडवा ते रामनवमी दिनांक 22/03/2023 ते दिनांक 30/03/2023 अखेर घरकुल बांधकाम आवास सप्ताहाचे आयोजन केलेले होते – गटविकास अधिकारी मनोज राउत
पंचायत समिती करमाळा अंतर्गत गुढीपाडवा ते रामनवमी दिनांक 22/03/2023 ते दिनांक 30/03/2023 अखेर घरकुल बांधकाम आवास सप्ताहाचे आयोजन केलेले होते. सदर आवास अभियान कालावधीमध्ये घरकुल लाभार्थ्यांनी स्वतःचे हक्काचे घरावर लाभार्थ्यांनी गुढी उभारून आनंदोत्सव साजरा केलाला आहे. आवास अभियान कालावधीमध्ये 62 घरकुलाचे
करारनामे या कार्यालयास प्राप्त झालेले आहेत. तसेच पंडित दीन दयाळ उपाध्याय जागा खरेदी योजने अंतर्गत मौजे जिंती येथिल अनुसुव्हीत जमातीचे 2 लाभार्थी, मौजे शेलगाव (वां) येथील अनुसूचित जाताचे 2 लाभार्थी व मौजे पोथरे येथील भटक्या जमातीचा 1 लाभार्थी असे एकूण 5 घरकुल लाभार्थ्यांनी जागा खरेदी केलेली असून त्यांचे प्रस्ताव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर यांचेकडे मंजुरीसाठी सादर केलेले होते त्यास मान्यता मिळालेली असून सदर लाभार्थीना शासन नियमानुसार
गावाच्या रेडीरेकनर दरानुसार अनुदान मंजूर करून त्यांचे खातेवरती अनुदान जमा करणेत आलेले आहे. त्याचबरोबर सदर आवास सप्ताह कालावधीत 36 घरकुल लाभार्थींना पहिला हप्ता रक्कम रुपये- 540000/-, 79 लाभार्थींना दुसरा हप्ता रक्कम रुपये – 4780000/-, 55 लाभार्थींना तिसरा हफ्ता रक्कम रुपये – 2170000/-, 15 लाभार्थींना चौथा हप्ता रक्कम रुपये – 280000/- असे एकूण रक्कम रुपये – 77,70,000/- सत्त्याहत्तर लाख सत्तर हजार रुपये एवढे अनुदान गुढीपाडवा ते रामनवमी दिनांक 22/3/23 ते दिनांक 30/3/23 अखेर घरकुल लाभार्थींच्या खातेवरती वर्ग करणेत आलेले आहे. तसेच सदर आवास सप्ताहामध्ये 52 घरकुल लाभार्थींना हक्काचे घर मिळाले आहे.