आळजापूर ग्रामपंचायतीचा अविश्वास ठराव मंजूर
करमाळा प्रतिनिधी
आळजापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच मनीषा घोडके यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मंजूर झाला आहे.तहसीलदार समीर माने यांच्या उपस्थित मंगळवारी झालेल्या विशेष सभेत हा ठराव मंजूर झाला आहे वरील सर्व घडामोडी पँनल प्रमुख आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालकडॉ हरिदास केवारे,माजी सरपंच बिभीषण खरात,ऍड. नितीन गपाट यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली सर्व झाल्या आहे यावेळी
नितीन गपाट, महादेव गायकवाड, वैशाली केवारी,संजय रोडे,कलावती काळे,वच्छला काळे व पार्वती रोडे या ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता ग्रामपंचायत सदस्य कैलास रोडे व सरपंच मनीषा घोडके हे दोघे बाजूला होते सात विरूध्द दोन असा ठराव मंजुर करण्यात आला आहे
…..
मिळालेल्या माहिती नुसार पँनल प्रमुख आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक डाॅ हरिदास केवारे यांच्याकडे सर्व ग्रामस्थ व सदस्यांनी सुशिक्षित इंजिनिअर संजय अशोक रोडे यांना सरपंच पदाची संधी दयावी अशी मागणी होत आहे तथापी वरील सर्व बाबीवर डाॅ केवारे,माजी सरपंच बिभीषण खरात,उपसरपंच नितीन गपाट, हेच निर्णय घेणार असल्याचे समजते