करमाळा प्रतिनिधी

चला शाळेला जाऊया !! उपक्रमांतर्गत पुणे विभागीय उपसंचालक गणपत मोरे यांनी 8 सप्टेंबर 2026 रोजी करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीट व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजे या शाळांना भेटी दिल्या. सर्वप्रथम गणपत मोरे यांचे गटसाधन केंद्र करमाळा या ठिकाणी जेष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी जयवंत नलवडे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. मोरे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीट या ठिकाणी शाळेच्या सर्व भौतिक सुविधा, शालेय पोषण आहार, शालेय परिसर, परसबाग व विद्यार्थी सुविधा यांची पाहणी केली. इयत्ता चौथीच्या वर्गातील मुलांच्या गुणवत्तेची पडताळणी केली. भाषा विषयाचे शुद्धलेखन गणित विषयाच्या सर्व क्रिया तसेच इंग्रजी विषयाचे लेखन या बाबींची पडताळणी केली. इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली व शालेय परिसर स्वच्छ व सुंदर असल्या बाबत मोरे यांनी समाधान व्यक्त केले. यानंतर वीट शाळेतील सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना अध्यापन करताना कोणत्या बाबींवर बारीक लक्ष द्यावे याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर इयत्ता पहिली मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत वर्ग शिक्षकांनी अत्यंत जागरूक रहावे या विषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजे या ठिकाणी भेट दिली असता शाळेला लोकसहभागातून केलेल्या भौतिक सुविधांची पाहणी केली. शाळेमध्ये असणारा RO प्लॅन्ट, शालेय बोलक्या भिंती, बहुतेक सुविधा व शालेय परिसर याबाबत सर्व शिक्षक व ग्रामस्थांचे अभिनंदन केले. इयत्ता पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पडताळणी केली. विद्यार्थी श्रुतलेखन करत असताना केलेल्या चुका सुधारण्यासाठी मोरे यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजे या ठिकाणी सर्व शिक्षकांना शालेय विद्यार्थी गुणवत्ता हीच खरी आपली कमाई असल्याबाबतचे प्रतिपादन मोरे यांनी केले. भौतिक सुविधा करत असताना विद्यार्थी गुणवत्ता ही वाढविण्यावर भर देण्याबाबत सर्व शिक्षकांना सूचना दिल्या.

या शाळा भेटी वेळी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वेळापूर येथील अधिव्याख्याता अरुण पाटील, करमाळा गटशिक्षणाधिकारी रिंकल हाडके मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी नितीन कदम,  मिनीनाथ टकले व जयवंत नलवडे तसेच वीट केंद्राचे केंद्रप्रमुख प्रसाद कुलकर्णी व करंजे केंद्राचे केंद्रप्रमुख संजय मुंडे, संतोष पोतदार इत्यादी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *