पोटेगाव बंधारा पहाणीसाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी दाखल…
करमाळा प्रतिनिधी
(आमदार संजय मामा शिंदे यांच्या समोर निलज, पोटेगाव, बाळेवाडी ग्रामस्थांनी मांडल्या होत्या व्यथा )
प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील सर्वात जुना असणारा
( 30वर्षांपूर्वी ) सीना नदीवर झालेला पोटेगाव येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा होय.या बांधाऱ्याच्या दुरुस्ती साठी वारंवार
मागण्या केल्या जात होत्या. नादुरुस्त असणारा हा बंधारा अतिवृष्टीमुळे निकामी झाला होता. या बांधऱ्यावरून मुख्यत्वेकरून बाळेवाडी, पोथरे, पोटेगाव, निलज आदी गावांना त्याचा लाभ मिळत होता. परंतु गेल्या 10 ते 15 वर्षांपासून या बंधाऱ्यांमध्ये पाणी साठत नसल्यामुळे त्याचा फायदा कोणालाही होत नव्हता.
आ. संजयमामा शिंदे हे गाव भेट दौऱ्यानिमित्त मौजे निलज या ठिकाणी आले असता गावाकरी मंडळींनी पोटेगाव बांधऱ्याचा प्रश्न उपस्थित केला. लागलीच आ.संजयमामा शिंदे यांनी अधीक्षक अभियंता डॉ ह. तू. धुमाळ मुख्य (विप्र )पुणे यांच्याशी फोनवरून सूचना केल्या.
लागलीच दुसऱ्या दिवशी डॉ धुमाळ,धी. बा. मुख्य अभियंता, श्री धीरज साळे, अधीक्षक अभियंता सोलापूर,एम. टी. जाधवर कार्यकारी अभियंता सोलापूर,एस. के. आवताडे उप अभियंता करमाळा असे सर्व वरिष्ठ अधिकारी पोटेगाव च्या बांधऱ्याची पहाणी करण्यासाठी आले .या दुरुस्ती साठी जवळपास 4 कोटी रुपये निधी ची आवश्यकता आहे. सदर निधी मधून या बंधाऱ्याचे काम मजबूत होईल अशी अपेक्षा या भागातील नागरिक करीत आहेत.