नाभिक समाजाचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना वस्तारा भेट देऊन अनोखे अंदोलन
जेआरडी माझा
काल फलटण येथे जाहीर सभेत बोलत असताना आमदार रामराजे नाईक निंबाळकर हे विरोधकावर टिका करत असताना आता आम्ही काय दाढ्या करायच्या काय असे व्यक्तव्य केले या व्यक्तव्याच्या निषेध सकल नाभिक समाजाच्या वतीने कुर्डुवाडी येथे करण्यात आला.
या वेळी त्यांना दाढ्या करण्यासाठी वस्तारा भेट पाठवण्यात आला.


आणि त्यासोबत एक पञ पाठवुन त्यामध्ये सकल नाभिक समाजाच्या भावना दुखवल्याबद्दल माफी मागा असे अवाहन करण्यात आले असुन नाभिक समाज जो पारंपारीक व्यवसाय करतो तो व्यवसाय म्हणजे ग्राहकाची दाढी कटींग करणे हा व्यवसाय करणे म्हणजे कलेचे काम आहे.हा व्यवसाय सहज कोणीपण करु शकत नाही.आमदार सभेमध्ये दाढ्या करु काय म्हणल्यामुळे त्यांना वस्तारा भेट देऊन ग्राहकांची दाढी करा.अन्यथा नाभिक समाजाची माफी मागा असे लोकशाही पध्दतीने अंदोलन सकल नाभिक समाजाच्या वतीने कूर्डुवाडी येथील पोस्ट कार्यालयात करण्यात आले.
यावेळी राष्टीय नाभिक संघटनेचे प्रदेश युवक अध्यक्ष सुधिर भाऊ गाडेकर,साम्राज्य आरमार संघटनेचे ऊमेश पाटील,रामभाऊ राऊत,कुमार दळवी,पोपट गाडेकर,बंडु चौधरी,संतोष गाडेकर,सुहास सरडे,तेजस गाडेकर आदी समाज बांधव ऊपस्थीत होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *