आमदार संजयमामाच विकासरत्न २०१९ च्या विधानसभेला आमदार संजयमामा शिंदे यांच्यासोबत काम केल्याच सार्थक झालं- श्रीकांत साखरे
विधानसभा निवडणुकीच्या वेळी आणि त्यानंतर संजयमामा आमदार झाल्यानंतर ज्या ज्या कामांची मागणी राजुरी गावासाठी केली ती सर्वच्या सर्व कामे आमदार संजयमामा शिंदे यांनी अवघ्या ३ वर्षात पूर्ण केल्याने विधानसभा निवडणुकीच्या काळात आमदार संजयमामा शिंदे यांच्यासोबत संपूर्ण तालुक्यात प्रचार करून मामांना आमदार करण्यात खारीचा वाटा उचल्याचं सार्थक झाल्याची भावना राजुरीचे सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत साखरे यांनी बोलून दाखवली.
राजुरी गावाने विधानसभेला तुलनेने कमी सहकार्य करून देखील राजुरीच्या शेतकऱ्यांना अंत्यत त्रासदायक असणारा वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी राजुरीसाठी सबस्टेशन मंजुरी,आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे प्राथमिक आरोग्य केंद्र,वाहतुकीसाठी अंत्यत महत्वाच्या राजुरी ओढ्यातील पुलाचे काम , खूप वर्षे प्रलंबित असणार राजुरी-वाशिंबे रस्त्याचे काम,पद्मावती देवीच्या मंदिरासाठी दिलेला सभामंडप, राजूरीतील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात भेडसावत असणारा शेतीच्या पाण्याच्या अपुऱ्या साठ्याचा त्रास कमी करण्यासाठी तळ्यात पाणी येण्याच्या संदर्भात घातलेल यशस्वी लक्ष ,ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यलयाला दिलेली मंजुरी,जलजीवन मिशन अंतर्गत मंजुरी देऊन राजुरीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला अश्या राजुरीच्या विकासाच्या दृष्टीने येणाऱ्या एक ना अनेक अडचणी सोडवण्यासाठी मामांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत केलेला राजुरी गावाचा सर्वांगीण विकास इत्यादी सर्वच विकासकामांमुळे राजुरीच्या विकासासाठी प्रयत्नशील असणारा सुजाण नागरिक म्हणून आज खरोखरच आमदार संजयमामा शिंदे यांचे आभार मानून ऋण व्यक्त करत असल्याची भावना मनामध्ये असल्याचं श्रीकांत साखरे यांनी बोलुन दाखवलं.