करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यामध्ये सतत आठ ते दहा दिवसांपासून ढगफुटी अतिवृष्टीचा सतत पाऊस पडत असल्यामुळे ओढे नाले नद्या तुडुंब भरून वाहिल्याने सीना नदीकाठच्या गावांना पाण्याने वेडा मारला होता. त्याचबरोबर तालुक्यातील अनेक गावातील कुटुंबांच्या घरामध्ये पाणी जाऊन संसार उपयोगी भांड्याचे व अन्नधान्याचे भयंकर नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतातील हातातोंडाशी आलेली पिके यासह शेतजमिनी वाहून गेल्या यांना सावरण्यासाठी एक मदत म्हणून करमाळा तालुक्यातील सरपंच उपसरपंच यांनी आपले एक महिन्याचे मानधन पूरग्रस्तांना देऊन एक मदतीचा हात द्यावा आणि ही मदत‌ राजकारण किंवा फोटो प्रसिद्ध न करता करमाळा तहसील कार्यालयात जमा करून तहसील कार्यालयाच्या माध्यमातून वाटप करण्यात यावे असे आवाहन फुंदेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच किरण फुंदे यांनी तालुक्यातील सरपंच उपसरपंच यांना हात जोडून आवाहन केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *