करमाळा प्रतिनिधी

विजयसिंह मोहिते-पाटील प्राथ. शिक्षक पतसंस्थेची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी सभासदांच्या यशस्वी पाल्यांचा व आदर्श शिक्षकांचा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला. या सभेसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश शिंदे, शिक्षक संघाचे नेते चंद्रहास चोरमले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक अध्यक्षस्थानी असलेले विद्यमान चेअरमन दत्तात्रय जाधव यांनी केले. १५ वर्षातील संस्थेची वाटचाल, सभासदांसाठी कर्ज मर्यादेत वाढ, संस्थेच्या वाटचाली विषयी माहिती दिली सूत्रसंचालन सचिव संतोष शितोळे व अहवाल वाचन व्हा. चेअरमन मुचकुंद काळे यांनी केले. सर्वांचे आभार संचालक उदयसिंह काटुळे यांनी केले. सभा यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थेचे संचालक बापू गरड, राम मोरे, सिद्धेश्वर चिंचकर, कैलास निर्मळ, सुरेश आटोळे, सुरेश राऊत, ख्वाजा काझी, माळी मॅडम, क्षीरसागर मॅडम, सहसचिव श्रीकृष्ण अडसुळ यांनी परिश्रम घेतले. यावेळी सभेला मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *