करमाळा प्रतिनिधी

करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, 9 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. सोलापूर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ‘एक दिन, एक घंटा, एक साथ’या थीमनुसार कमलाभवानी मंदिर येथे विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर यांच्या मार्गदर्शनाने श्रमदान करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी. पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना श्रमदानाचे महत्त्व पटवून देऊन श्रमदान ही एक देशसेवाच आहे असेही सांगितले. एन.सी.सी. च्या कॅडेट् यांनी कमला भवानी मंदिरा भोवतालच्या परिसरातील गवत काढून, झाडूने स्वच्छता करून घेतली. हा श्रमदानाचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य संभाजी किर्दाक, दादा पुजारी, मंदिर समितीचे अध्यक्ष घाटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे नियोजन एन.सी.सी. विभागाच्या कॅप्टन प्रा. डॉ. विजया सोनवणे (गायकवाड), केअर टेकर प्रा.राम काळे व निलेश भुसारे यांनी केले होते. स्वच्छतेनंतर मंदिर समितीच्या वतीने एन.सी.सी. कॅडेट्स ला नाश्ता व चहापान देण्यात आले. एन.सी.सी. विभागाच्या वतीने सहकार्याबद्दल मंदिर समितीचे आभार व्यक्त करण्यात आले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *