करमाळा प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सोलापूर येथे भेट घेतली. यावेळी तालुक्यातील गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीसाठी बॅन्जो परवानगी मिळावी. याबबतचे निवेदन भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी दिले आहे. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, तालुकाध्यक्ष काका सरडे, भगवान गिरी उपस्थित होते.

या संदर्भात पालकमंत्री यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत शासकीय नियमानुसार प्रत्येक गणेश मंडळांना बॅन्जो परवानगी देण्यात यावी असे आदेश दिले.

यावेळी गणेश भक्तांच्या भावना लक्षात घेऊन घेतलेल्या या सकारात्मक निर्णयाबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

महायुती सरकारच्या धोरणाखाली भक्तीभाव आणि परंपरेला प्राधान्य देत गणेश भक्तांना दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सवाच्या मंगल संधीला भक्तिपूर्ण व धार्मिक वातावरणात साजरा करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *