
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी चालू असणारे अवैध व्यवसाय मटका जुगार सह इतर व्यवसायाला आळा घालण्यात पोलिसांना यश आले आसून त्यामध्ये प्रामुख्याने मटका व जुगार चालविण्याचा प्रमाण शहरामध्ये जास्त होते. नवनियुक्त पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी करमाळा पोलीस स्टेशन पदभार घेतल्या पासून मटका कींग म्हणून मिरवणारे मटका व्यवसाय करणारे बुकी चालक यांचे धाबे दणाणले असून त्यामध्ये उपविभागीय अधिकारी आय पी एस अंजना कृष्णा यांनी देखील पदभार घेतल्या पासून मटका जुगार सह इतर अवैध व्यवसाय च्या विरोधात मोहीम चालू

केल्यामुळे सामान्य नागरिकांमधून यांचे कौतुक होत असून अशा पध्दतीने अवैध व्यवसाय कायम स्वरूपी बंद राहिले तर तालुक्यातील गुन्हेगारी व तरूण पिढी उद्याचं देशाचं भविष्य असणारी व्यसनाच्या आहारी जाऊन आपलं आयुष्य उध्वस्त करून घेत आहे ते थांबेल. प्रमुख्याने मटका जुगार क्लब हे कायमचे बंद करावे. पोलीस प्रशासनाचे मी आभार मानतो. त्यांनी आपलं कर्तव्य ज्या पद्धतीने पार पाडत आहेत ते कौतुकास्पद आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस चे मा. अध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी व्यक्त केले आहे.