
करमाळा प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकी नंतर आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत सुध्दा करमाळा तालूका माझ्या पाठीशी असल्याचा ठाम विश्वास आमदार नारायण आबा पाटील यांनी बोलून दाखवला. वांगी २ येथील सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक बापूराव देशमुख होते तर यावेळी व्यासपीठावर बाजार समिती संचालक बापुराव रणसिंग, सभापती अतुलभाऊ पाटील, माजी सभापती शेखर गाडे, उपसभापती गणेश चौधरी, कदम रावसाहेब, महादेव चौधरी,

जोतीराम नरूटे, दत्तात्रय आण्णा रणसिंग, गणेश जाधव, सुरेश जाधव, सतिष चौधरी, विशाल तकीक, बपा महाडीक, काकासाहेब जाधव, बशीर पटेल, मोरे, औदुंबर सातव, वैभव पाटील, आप्पासाहेब सातव, नामदेव सपकाळ, बाळू महाडीक, बाळासाहेब चौधरी, महादेव तकीक, बापूराव खराडे, गोरख देशमुख, राहूल जाधव,विष्णू महाडीक, काकासाहेब भानवसे, नामदेव महाडीक, विजय ढावरे, मधूकर जाधव, दादा माने आदि उपस्थित होते. तर शेलगाव (वांगी) येथील सभेस कार्यक्रमाचे अध्यक्ष काकासाहेब पाटील, अतुलभाऊ पाटील, शेखर गाडे, कदम रावसाहेब, माजी जि.प. सदस्य चंद्रप्रकाश दराडे गुरुजी, नवनाथ आबा

केकाण, सोसायटी चेअरमन रघुनाथ केकाण, दत्तात्रय केकाण, वसंत केकाण, ठोकळ सर, भारत पोटें, समाधान जाधव, किरण साळुंके, प्रविण घोगरे, विठ्ठल केकाण, ब्रम्हदेव जाधव, नामदेव दराडे, चंद्रकांत केकाण, बाळासाहेब बेरे, दत्तात्रय यादव, विजयकुमार जाधव, प्रविण पोळ, बंकट कदम,धनंजय कारे, प्रविण केकाण, युवराज टकले, गोविंद ठोंबरे, देविदास केकान, नागनाथ केकण, संतोष केकाण आदि उपस्थित होते. यावेळी केकान महाराज, उमेदवार दादासाहेब पाटील, सभापती अतुलभाऊ पाटील, महेंद्र पाटील, बापुराव देशमुख आदिंची भाषणे झाली. या सभांना केम गटातील दत्ताबापु देशमुख, राधिका तळेकर, विजय नवले, दादासो पाटील, महेंद्र पाटील हे उमेदवार उपस्थित होते. प्रास्ताविक आमदार पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले तर आभार सरपंच अमरदादा ठोंबरे यांनी मानले. दोन्ही सभांना मोठ्या संख्येने सभासद मतदार उपस्थित होते.