करमाळा प्रतिनिधी
दि. ०१/०९/२०२५ रोजी सकाळी ११/४० वा.चे. सुमारास रणजीत माने, पोलीस निरीक्षक, करमाळा पोलीस ठाणे यांनी व त्यांचे पथकांनी कारवाई केली.
यात हकिकत अशी की, दि ०१/०९/२०२५ रोजी सकाळी ११/४० वा. चे सुमारास पोसई/सुशिलकुमार पाखरे यांना गोपनिय बातमी मिळाली की, मौजे केम ते कंदर रोडणे केम कडुण तीन इसम स्कुटर, चारचाकी वाहणात असुन ते गांजा विक्री साठी घेवुन येणार आहेत. अशी बातमी मिळाल्याने सदर बाबत पोना पवार यांनी आम्हांस दिली. सदर बाबत आम्ही स्वतः अंजना कृष्णा व्ही. एस., उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा उपविभाग यांना माहीती दिली व सदर बातमीतील माहीती प्रमाणे कारवाई करीता लागणारी लेखी अधिकार पत्र घेवून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आम्ही स्वताः शासकिय पंच पोलीस स्टाफ असे मौजे कंदर कडे रवाना झालो.
सदर ठिकाणी गेल्यानंतर मिळालेल्या बातमीप्रमाणे केम कडुन कंदर जाणारे रोडवर जावुन थांबलो असता केम कडुन कंदर च्या दिशेने एक बिगर नंबरची स्विफ्ट कार व एक बिगर नंबरची अॅक्टीव्हा स्कुटर येताणा दिसली. त्याचा आम्हांस मिळालेल्या बातमी प्रमाणे संशय आला. त्यावेळी आम्ही त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते थांबले नसल्याने आम्ही त्याचा पाठलाग केला असता त्यांनी त्यांची वाहणे मौजे कंदर हट्टीतील केम कंदर रोडवर डावीकडे वळवुन विजय नवले यांचे घराकडे जाणारे कच्चा रोडणे जात असताना त्यांना जागी थांबविले. त्यावेळी ती वेळ १६/५५ वा ची होती. त्वरीत पोलीस स्टाफने सदर इसमास घेराव टाकुन आम्ही स्वताः व सोबतवे पंचानी व पोलीस स्टाफचा पुर्ण परीचय देवुन आपले ओळखपत्र दाखवुन पोलीस असल्याचे आम्ही परीचय दिला. सदर इसमा पैकी अॅक्टीव्हा स्कुटर चालवित असलेल्या इसमास त्यांचा नाव पत्ता विचारले असता त्यांने त्याचे नाव सचिन नागनाथ निचाळ वय २६ वर्षे रा. वेणेगाव ता. माढा जि. सोलापुर असे सांगितले. त्यांचे पाठिमागे असलेल्या स्विप्ट कार मध्ये असलेल्या इसमास त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांने त्यांचे नाव आकाश उर्फ सोन्या उत्तरेश्वर गोसावी वय २६ वर्षे रा. वेणेगाव ता. माढा जि. सोलापुर व त्याचे सोबत दुस-या इसमास नाव विचारले असता सचिन सुरेश बावळे वय ४० वर्षे रा. वेणेगाव ता. माढा जि. सोलापुर असे असल्याचे सांगितले.
सदर बातमीतील दोन्ही वाहणात आम्ही स्वताः पंचासमक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता सचिन नागनाथ निवाळ वय २६ वर्षे रा. वेणेगाव ता. माढा जि. सोलापुर यांचे ताब्यातील बिगर नंबरची अॅक्टीव्हा गाडीचे डिक्कीत त्याने उघडुन दाखवली असता त्यांचेत एक चिकटपट्टीने पॅक केलेले पाकीट व स्विफ्ट कार मध्ये बसलेले इसम नामे आकाश उर्फ सोन्या उत्तरेश्वर गोसावी वय २६ वर्षे रा. वेणेगाव ता. माढा जि. सोलापुर व सचिन सुरेश बावळे वय ४० वर्षे रा. वेणेगाव ता. माढा जि. सोलापुर स्विफ्ट मधील इसम नामे सचिन सुरेश बावळे याने गाडीची डिक्की उघडुन दाखवले व सदर डिक्की मध्ये पाच चिकटपट्टीने पॅक केलेले पाच पाकीट मिळून आले. सदर सहा पाकिटे पंचा समक्ष आम्ही स्वताः व पंच यांनी उघडुन पाहिली असता त्यात झाडपत्ती सारखा ओलसर व उग्र वास येणारा गांजा असल्याचे दिसुन आले असे एकुण सहा पाकीटे दोन्ही वाहणाचे तपासणी करून मिळून आले. त्याचे वजन १३ किलो ४५० ग्रॅम प्रति किलो अंदाजे भाव २५,०००/-प्रमाणे ३,३६, २५० रू. किंमतीचा गांजा मिळून आला व सदर इसमाकडे अॅक्टीव्हा स्कुटर ची किंमत ७५,०००/- व स्विफ्ट गाडी ची किंमत ४,००,०००/- असे एकुण ८,११, २५० (आठ लाख अकरा हजार दोनशे पन्नास रूपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सदर बाबत पोना ११६२ मनिष पवार यांनी आरोपी नामे सचिन नागनाथ निचाळ वय २६ वर्षे रा. वेणेगाव ता. माढा जि. सोलापुर, आकाश उर्फ सोन्या उत्तरेश्वर गोसावी वय २६ वर्षे रा. वेणेगाव ता. माढा जि. सोलापुर व सचिन सुरेश बावळे वय ४० वर्षे रा. वेणेगाव ता. माढा जि. सोलापुर यांचे विरूध्द सरकार तर्फे फिर्याद दिली असुन गुरनं ७२५/२०२५ अन्वये एन.डी.पी.एस अॅक्ट कलम ८ (क) २० (ब) (11) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुशीलकुमार पाखरे हे करीत आहेत.
सदर आरोपी नामे आकाश उर्फ सोन्या उत्तरेश्वर गोसावी वय २६ वर्षे रा. वेणेगाव ता. माढा जि. सोलापुर याचे विरूध्द असलेले दाखल गुन्हे तक्ता
टेंभुर्णी पो. ठाणे गुरनं. १९६/२०२० – भा.द. वि. कलम ३९२,३४
मंद्रप पो. ठाणे गुरनं. ३५४/२०२० – भा.द.वि. कलम ३९२,३४१,३६३,५०६,३४
टेंभुर्णी पो. ठाणे अदखलपात्र ५१८/२०२३ – भा.द. वि. कलम ३२३,५०४,५०६,३४
टेंभुर्णी पो. ठाणे अदखलपात्र ९३०/२०२४ – भा. न्या. सं. कलम ११५ (२),३५१(२),३५२
टेंभुर्णी पो. ठाणे अदखलपात्र ५२८/२०२५ – भा. न्या.सं. कलम ११५ (२),३५१(२),३५२
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक प्रिमत यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस., करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांचे मार्गदर्शनाखाली पोसई / सुशिलकुमार पाखरे, सपोफौ शिनगारे, पोहेका / १५० आप्पासाहेब लोहार, पोहेका / १६४८ अजित उबाळे, पोना / ११६२ मनिष पवार, पोना / ९१२ वैभव ठेंगल, पोका / ४३८ रविराज गटकुळ, पोकों / १६७ मिलींद दहीहांडे, पोका / ८५६ अर्जुन गोसावी, पोका / ६८९ येवले पोका / २५ भराटे, पोका / १५२४ रंदिल, पोकों / ९६१ खोटे, पोका /१२७५ प्रसाद काटे तसेच सायबर पो ठाण े कडील पोहेका / २२२ व्यंकटेश मोरे यांनी केली आहे.