छत्रपती संभाजी तलाव व किल्ला परिसर बर्ड फ्लू (H1N1)बाधित क्षेत्र म्हणून घोषित, या परिसरातील चिकन शॉप बंद करण्याचे आदेश

नागरिकांनी घाबरू नये, परंतु काळजी घेण्याचे आवाहन

सोलापूर, दिनांक 17(जिमाका):- सोलापूर महापालिकेच्या हद्दीतील छत्रपती संभाजी नगर तलाव परिसर व किल्ला भाग परिसरात 7 मार्च रोजी कावळा व बगळा या पक्षांचा नैसर्गिक मृत्यू झाला होता. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येऊन त्या प्राण्यांना बर्ड फ्लू असल्याचा अहवाल प्राप्त झालेला होता. त्या अनुषंगाने बर्ड फिल्म प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कृती आराखडा 2021 नुसार उपरोक्त दोन्हीही परिसर हे दक्षता झोन म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. तरी सर्व शासकीय विभागानी या क्षेत्रात व अन्य भागात बर्ड फ्ल्यू च संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

      जिल्ह्यात बड फ्ल्यू चा संसर्ग होऊ नये या अनुषंगाने करावयाच्या उपाय योजनेच्या दृष्टीने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी पोलीस शहर उपायुक्त दिपाली काळे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर व्हि डि. येवले, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ एन. एल. नरळे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. भास्कर पराडे, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. संतोष भोई यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

     जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की महानगरपालिका हद्दीतील छत्रपती संभाजी नगर तलाव परिसर व किल्ला भाग परिसर हे बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलीस विभागाने या परिसरातील सर्व चिकन शॉप बंद करावेत. महापालिकेने या परिसराचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. या परिसरात सर्वसामान्य नागरिकांच्या माहितीसाठी बॅनर्स लावावे तसेच महापालिकेने या ठिकाणी माहिती देण्यासाठी कर्मचारी नियुक्त करावेत. त्याचप्रमाणे पशुसंवर्धन विभागाने या भागातील घरगुती प्राणी पक्षी यांचे सर्वेक्षण पूर्ण करून घ्यावे व त्यातील आजारी प्राण्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवावे, असेही त्यांनी निर्देशित केले.

     मृत्यू पावलेल्या पक्षांचे डिस्पोजल महानगरपालिकेने करावे त्यासाठी जागा शोधून ठेवावी. वन विभागाने जंगली पक्ष मृत्यू पावल्यास त्याचे डिस्पोजल साठी महानगरपालिकेकडे पाठवावे. पक्ष्यांच्या डिस्पोजल साठी महानगरपालिकेने पथके तयार करावीत. प्रत्येक विभागाने कृती आराखड्याप्रमाणे त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे पार पाडून हा आजार इतरत्र फैलावणार नाही यासाठी दक्ष रहावे असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले. तसेच सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी बर्ड फ्लू आजाराच्या अनुषंगाने घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. हा आजार पक्षांमध्ये आढळून आलेला आहे, परंतु हा आजार इतरत्र फैलावणार नाही यासाठी सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

     प्रारंभी पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर येवले यांनी सोलापूर महापालिका हद्दीत छत्रपती संभाजी नगर तलाव व किल्ला बाग परिसरात कावळा बगळा इत्यादी पक्षी नैसर्गिक मृत्यू झाल्याचे आढळून आल्याने त्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेले होते त्यानुसार त्यांच्या अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हा परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तसेच या ठिकाणी कृती आराखडा याप्रमाणे उपाययोजना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

     तसेच छत्रपती संभाजी नगर तलाव परिसर व किल्ला भाग परिसर एक किलोमीटर परिघातील 74 नमुने तर झिरो ते दहा किलोमीटर परिघातील 126 नमुने घरगुती पक्षी प्राण्याचे घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे सांगून बर्ड फ्लू हा संसर्ग जंगली पक्षांमध्ये झालेला असून घरगुती पक्षांचे नमुने तपासणी अहवाल उद्या प्राप्त होणार असल्याची माहिती डॉ. येवले यांनी यावेळी दिली.

           या आजाराच्या अनुषंगाने नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही परंतु बाधित क्षेत्रातील चिकन शॉप बंद करण्यात आलेले आहेत. या परिसरातून चिकन खरेदी करू नये. तसेच कोणत्याही ठिकाणाहून चिकन खरेदी केल्यानंतर ते 100 डिग्री तापमानावर व्यवस्थित शिजवून खावे. अंडी बॉईल करून खावेत. बाधित क्षेत्रात नागरिकांनी जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *