
करमाळा प्रतिनिधी
दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन मधील डॉ. सचिन बेरे (एआय आणि डीएस विभाग प्रमुख), प्रा. प्रशांत सूर्यवंशी (स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख), प्रा. शिवाजी भोसले (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख) आणि प्रा. शितल धायगुडे (डीन अकॅडमीक) यांनी स्वामी चिंचोली येथील सीमा चव्हाण यांच्या एआय शेती प्रकल्पास भेट दिली. यावेळी त्यांनी शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा कसा वापर केला जातो, यावर सखोल चर्चा केली.

AI तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीत होणारे फायदे आणि त्याच्या उपयोगाबद्दल सविस्तर माहिती दिली. AI तंत्रज्ञानामुळे पिकांच्या आरोग्याचे परीक्षण, कीड व रोगांची ओळख, मातीचा दर्जा आणि हवामान आधारित पिक व्यवस्थापन सहजपणे करता येते. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढविण्यात आणि खर्च कमी करण्यात मदत मिळत आहे.

चर्चेच्या दरम्यान, AI तंत्रज्ञानाच्या अधिक प्रभावी वापरासाठी कशा प्रकारे सुधारणा केली जाऊ शकते यावर विचार मंथन झाले. प्राध्यापकांनी या तंत्रज्ञानात नवीन गोष्टींचा वापर करून कशा प्रकारे उत्पादनात वाढ करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन मधील प्राध्यापकांनी भविष्यात या प्रकल्पामध्ये सहकार्य करण्याची संधी आणि शेतकरी आणि तंत्रज्ञान यांचे सुसंवाद साधण्यासाठी उपाय योजनेवर चर्चा केली.
हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकतो, ज्यामुळे शेतकऱ्यांची उत्पादकता वाढेल आणि त्यांना त्यांच्या कामात अधिक मदत मिळेल.
सदर प्रकल्पासाठी सहकार्य करण्यासाठी प्रा. माया झोळ सचिव दत्तकला शिक्षण संस्था यांनी आश्वासन दिले असून डॉ. सचिन बेरे व सीमा चव्हाण यांना आवश्यक सर्व मदत देण्याचे ठरवले आहे. प्रा. माया झोळ यांनी सदर प्रकल्पांचे कौतुक केले व अशा प्रकारची एआय टेक्नॉलॉजी ऊस पिकासह इतर पिकांना देखील वापरण्यात यावी असे मत व्यक्त केले.
दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स मध्ये ए आय आणि ए आय डी एस या शाखा सुरू असून ए आय फार्मिंग संबंधी स्वतंत्र स्टार्टअप सुरू करण्याच्या प्रयत्नांना सहकार्य व आर्थिक सहाय्य करण्याचे प्रा. माया झोळ सचिव दत्तकला शिक्षण संस्था यांनी मान्य केले आहे.