
करमाळा प्रतिनिधी
कै.भागवत श्रीपती धुमाळ यांच्या स्मरणार्थ संदीप भागवत धुमाळ यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसकरवाडी शाळेस संगणक संच भेट देण्यात आला. कुसकरवाडी शाळा व्यवस्थापन समितीतर्फे गावातील पालक व ग्रामस्थांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शाळेची गरज ओळखून संदीप भागवत धुमाळ यांनी लहान मुलांच्या भविष्याची गरज ओळखून संगणक संच दिला आहे.

तसेच प्राध्यापक सौदागर शिंदे यांच्यातर्फे सर्व महापुरुषांचे फोटो फ्रेम शाळेस देण्यात आले. रघुनाथ शंकर साबळे यांच्या तर्फे मुलांना खेळण्यासाठी क्रीडा साहित्य देण्यात आले. विलास बाबासाहेब डबडे यांच्या तर्फे शाळेस 1000 लिटरची पाण्याची टाकी व बोर पासून सर्व नळ फिटिंग करून देण्यात आली त्यामुळे मुलांची पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय झाली आहे.

याप्रसंगी शाळेतर्फे सर्वांचा सत्कार आला. त्यावेळी कार्यक्रमास सेवानिवृत्त पीएसआय शहाजी धुमाळ, कोर्टी ग्रामपंचायतचे उपसरपंच हनुमंत जाधव मेजर, ग्रामपंचायत सदस्य सुरेश गाढवे, माजी उपसरपंच प्रवीण धुमाळ, माजी उपसरपंच नानासाहेब झाकणे, कोर्टी शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्रीमंत झाकणे, शिवजयंती उत्सव समिती चे सर्व सदस्य, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कामी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तुकाराम साबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. उपस्थितांचे आभार प्रभाकर गाडे सर व गणेश कोरपे सर यांनी मानले.