
करमाळा प्रतिनिधी
नेरले ते गौंडरे हे अंतर सहा किलोमीटर आहे. गौंडरे येथे दोन विद्यालय व डीसीसी बँकेची शाखा आहे. सिना कोळगाव प्रकल्प जवळ असल्यामुळे तिथे लोकांची विद्यार्थ्यांची जाणे येण्याची संख्या जास्त आहे. हा रस्ता पंधरा वर्षांपूर्वी झाला होता त्यानंतर आज पर्यंत रस्त्याचे काम झाले नाही. रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता हे ओळखू येत नव्हते. त्यामुळे पायी

चालणे देखील मुश्किल, विद्यार्थ्यांच्या सायकलचे चिमटे तुटून अपघात होतात, आज पर्यंत शंभरच्या आसपास अपघात झाले त्यामध्ये मुलींचे प्रमाण जास्त होते अपघात झाला तरी तुटलेली सायकल मुले कुठेतरी ठेवून ओळखीच्या गाडीवर येत होते. मुलींना मात्र तुटलेली सायकल खांद्यावर घेऊन ऊन पाऊस वारा याचा त्रास सहन करत यावे लागत होते. त्यामुळे हा रस्ता

खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी आम्ही उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा यांना लेखी निवेदन दिले होते. भाजपच्या महिला आघाडी राज्य उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल व शिवसेना नेते दिग्विजय भैया बागल यांनी देखील प्रयत्न केला. तसेच वर्तमान पत्रामध्ये प्रिंट मीडियामध्ये दि. 22/04/2023 बातम्या आल्या होत्या. याची दखल घेऊन रस्ता मंजूर करून त्याचे काम सुरू केले आहे. त्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. परंतु काम मजबूतव्हावे ही अपेक्षा. कारण आत्ताच्या काळामध्ये बांधकामे पाच महिने देखील टिकत नाहीत. ही शोकांतिका आहे. छत्रपती शिवराय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील रस्ते किल्ले ब्रिज मंदिरे घाट चारशे वर्ष मजबूत आहेत. हा आदर्श घेऊन ठेकेदार अधिकारी कर्मचारी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी बांधकामे मजबूत करायचा प्रयत्न करावा. मजबूत व नियमाप्रमाणे काम केल्यास सर्वांचा नागरिकांच्या वतीने सन्मान करणार असल्याचे औदुंबरराजे भोसले यांनी बोलताना सांगितले.