
करमाळा प्रतिनिधी
करमाळा पोलीस सोलापूर ग्रामीण गणेशोत्सव बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष करमाळा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, करमाळा पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला आहे

यावेळी नायब तहसीलदार लोकरे,करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गजानन गुंजकर, करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन तापसे, सहकारी संस्थेचे सहाय्यक विभाग उमेश बेंढारी, गट विकास पंचायत समितीचे अमित कदम, करमाळा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अभिषेक पवार, करमाळा भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधीक्षक प्रिया पाटील आदीजण उपस्थित होते.

यावेळी श्री छञपती शिवाजी महाराज तरुण मंडळ सावंत गल्ली गणेश उत्सव उत्कृष्ट देखावा व पारंपरिक खेळ मिरवणूक प्रथम क्रमांक बक्षीस जाहीर करण्यात आला पुरस्कार स्वीकारताना मंडळाचे मार्गदर्शक सुनील सावंत व मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
तसेच सरकार मित्रमंडळाने गणपती उत्सव स्थापनेपासून ते गणपती विसर्जनापर्यंत व तिथून पुढे वर्षभर सामाजिक व सांस्कृतिक तसेच सामाजिक सलोखा राखला जातो व कायमस्वरूपी राखण्यात येतो त्याबद्दल करमाळा पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण यांच्यावतीने सरकार मित्र मंडळ यांना सामाजिक सलोखा जोपासला जातो त्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला. यावेळी मंडळाचे मार्गदर्शक विजय लावंड व मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील ही विविध गणेशोत्सव मंडळांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.