करमाळा प्रतिनिधी

करमाळा माढा तालुका वारकरी संघटनेच्यावतीने करमाळा माढाविधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित विकास रत्न आमदार नारायण आबा पाटील यांचा नागरिक सत्कार करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय वारकरी संघटनेचे मार्गदर्शक गुरुवर्य ह. भ. प. भजन सम्राट मच्छिंद्र आप्पा अभंग महाराज, करमाळा तालुका अध्यक्ष ह. भ. प. नानासाहेब पांडुळे, समाजसेवक ह. भ. प. रामभाऊ कोकाटे, गुरुवर्य ह. भ. प. रामभाऊ निंबाळकर महाराज, अखिल भारतीय वारकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष

मृदंगाचार्य ह.भ.प. विजय महाराज अभंग, वासकर फडाचे ह.भ.प. विठ्ठल दादा पाटील, करमाळा तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष ह. भ. प. अण्णासाहेब सुपनवर, ह. भ. प. आबासाहेब तरंगे, ह. भ. प. भरत महाराज नाळे, ह. भ. प. विलास पोळ महाराज, ह. भ. प. विनायक महाराज मारकड, आबासाहेब शिंदे, हनुमंत महाराज मारकड, ह. भ. प. विलास राठोड महाराज,

ह. भ. प. संतोष शिंदे, ह. भ. प. तात्यासाहेब मिसाळ, ह. भ. प. सोमनाथ भोसले, ह. भ. प. नाना भोसले, चिंचगाव येथील ह. भ. प. तानाजी पवार, ह. भ. प. बंडू उबाळे महाराज, ह. भ. प. उबाळे महाराज, ह. भ. प. रुद्र महाराज भोसले, ह. भ. प. संजय बप्पा गायकवाड, ह. भ. प. धनंजय लोखंडे महाराज, ह. भ. प. धनंजय शेळके महाराज, ह. भ. प. विलास सरडे महाराज, करमाळा-माढा तालुक्यातील वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सकाराला उत्तर देताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की, करमाळा-माढा तालुक्यातील वारकऱ्यांच्या समस्या सोडवणार आहे. वृद्ध वारकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून 2400 रुपये मासिकमानधन मिळत आहे त्यासाठी करमाळा-माढा तालुक्यातील वृद्ध वारकऱ्यांना मानधन मिळवून देणार, करमाळा-माढा तालुक्यातुन अनेक संतांच्या पायी दिंड्या जात आहेत त्या सर्व रस्त्यांची कामे करणार आहे, करमाळा-माढा तालुक्यामध्ये वारकऱ्यांसाठी वारकरी भवन उभा करणार आहे, करमाळा-माढा तालुक्यातील वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना व त्या संस्थेला शासनाकडून मानधन मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार, करमाळा-माढा तालुक्यातील सर्व वारकरी संप्रदायातील सर्व महाराज मंडळींनी विधानसभा निवडणुकीमध्ये भरघोस मतदान दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *