निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन…
शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन…
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा यांच्या पुढाकारातून कृषी योद्धा शेतकरी गट फिसरे, राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी करमाळा व कुंभारगाव ऍग्रो प्रोडूसर कंपनी यांच्या वतीने दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजी अथर्व मंगल कार्यालय करमाळा या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक (सोलापूर ग्रामीण) अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते व सागर वाकचौरे (कळस कृषी प्रदर्शन,ता. संगमनेर) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. या प्रदर्शनामध्ये कृषीतज्ञ्, केळी जाचक पॅटर्नचे जनक कपिल चाचक व डाळिंब मार्गदर्शक, कृषी तज्ञ, उद्यम पंडित राहुल रसाळ तसेच पाणी फाउंडेशन चे प्रमुख मार्गदर्शक डॉ.अविनाश पोळ हे मार्गदर्शन करणार असून या प्रदर्शनाचा लाभ शेतकरी बांधवांनी घ्यावा असे आवाहन करमाळा तालुका पाणी फाउंडेशनचे समन्वयक प्रतीक गुरव व आशिष लाड यांनी केले आहे.
हे प्रदर्शन सकाळी ९ वाजता सुरू होणार असून या प्रदर्शनामध्ये फळबाग रोपे : जी ९- केळी टिशू कल्चर, डाळिंब, आंबा, एक्झॉटिक भाज्या व फळांची रोपे, हायटेक नर्सरी, सेंद्रिय शेती व उत्पादने : दहा ड्रम संच, गांडूळ खत, बायोगॅस, माती परीक्षण, गावरान सेंद्रिय बियाणे-भाजीपाला, अद्ययावत तंत्रज्ञान व स्मार्ट शेती : हवामान संच, सोलर पंप, फवारणी ड्रोन, ठिबक संच- उपकरणे, बजाज ऑटो, शेततळे कागद, शेटनेट हरितगृह,पशुधन : पशुखाद्य, मधुमक्षिकापालन, कुक्कुटपालन, मत्सव्यवसाय, शेती विषयक संस्था : कृषि विभाग, गट शेती, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि उद्योग व लघु उद्योगासाठी कर्ज बँक हे स्टॉल असणार असून विशेष आकर्षण म्हणून महिलांसाठी लाडकी बहीण लकी ड्रॉ असून विजेत्या महिलेला शिलाई मशीन भेट देण्यात येणार आहे. तसेच खिलार-महाराष्ट्राची शान बैलजोडी व देश विदेशातील डॉग हे प्रमुख आकर्षण राहणार आहे.
या प्रदर्शनामध्ये पानी फाऊंडेशन, कृषि विभाग-महाराष्ट्र शासन, उमेद अभियान, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा, करमाळा पोलीस स्टेशन, SV मॉल, वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट या संस्था सहभागी असणार आहेत. प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य असून स्टॉल बुकिंगसाठी संपर्क : ९७२३५२१४००, ८६६८९८३२६२, ९९०१८४८३१२ या क्रमांकावरती साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
………………..
फार्मर कप मधील महिला गटांचा होणार विशेष सन्मान…
अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये करमाळा तालुक्यातील महिला एकत्र येऊन प्रथमच आपल्या – आपल्या गावामध्ये महिलांचे गट स्थापन करून शेती करत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी घोटी, शेलगाव क, पोटेगाव,फिसरे, कुंभारगाव, वीट, सरपडोह, हिसरे, साडे व कोर्टी येथील महिला शेतकरी गटांचा समारोप कार्यक्रमात विशेष सन्मान होणार आहे. तसेच तुर या पिकामध्ये विक्रमी उत्पन्न घेणारे राहुल राऊत (कुंभारगाव) व मका या पिकांमध्ये विक्रमी उत्पन्न घेणारे अक्षय शेंडे (घोटी) यांचाही विशेष सन्मान होणार आहे.