करमाळा प्रतिनिधी
दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल SSC आणि CBSE विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ सर, उपाध्यक्ष रणादादा सुर्यवंशी, संस्थेच्या सचिव माया झोळ मॅडम, प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. बाबर सर, ग्रुप ऑफ स्कूलच्या डायरेक्टर आणि CBSE विभागाच्या प्राचार्या नंदा ताटे मॅडम, SSC विभागाच्या प्राचार्या सिंधू यादव मॅडम हे सर्व मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. श्रीनिवास रामानुजन यांनी गणितीय विश्लेषण, संख्या सिद्धांत, अनंत मालिका आणि सतत अपूर्णांक यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी मॉक थीटा फंक्शन्सचा अभ्यास केला. याप्रसंगी बोलत असताना त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. व गणित विषयाचे व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांसमोर विषद केले. आजच्या गणित दिनाचे औचित्य साधून सर्व गणित विषय शिक्षकांचा सन्मान देखील करण्यात आला.