करमाळा प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्यातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. दिव्या सुपेकर हिला रसायनशास्त्र विषयामधून सुवर्ण पदक मिळाले आहे. तिला बीएससी पदवी परीक्षेमध्ये एकूण 94.09% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला होता.
सदर सुवर्ण पदक तिला विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामध्ये प्रदान करण्यात येणार आहे. या यशासाठी तिला रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. चोपडे ए.एस, प्रा. भोसले डी.जी, प्रा. जाधव एस.एम, डॉ. देशमुख पी. व्ही., प्रा. राहुल भोंडवे यांचे मार्गदर्शन लाभले. या उत्तुंग यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा व व्यवस्थापन परिषद सदस्या (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
सोलापूर विद्यापीठ सोलापूर) पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते-पाटील, संस्थेचे मार्गदर्शक संचालक डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. देशमुख पी.व्ही यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.