करमाळा प्रतिनिधी
दि. ८ ऑगस्ट २०२४ रोजी यशकल्याणी सेवाभावी संस्था व पंचायत समिती करमाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने इंग्रजी वकृत्व स्पर्धा आयोजन करण्यात आले होते. आज झालेल्या जिल्हास्तरीय इंग्रजी वकृत्व स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी वकृत्व स्पर्धा पार पडल्या. त्या स्पर्धेमध्ये कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाची सान्वी अतुल पोळ हिचा ७ ते ८ वी गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला.
सान्वी पोळ हीचा कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव सर, उपमुख्याध्यापक भस्मे सर, पर्यवेक्षक अंकुश खाने सर यांनी तिचा सत्कार व अभिनंदन केले. तिला मार्गदर्शन करणारे इंग्रजी विषयाचे शिक्षक शिंदे सर, तनपुरे सर, दगडे मॅडम, वाघमारे मॅडम, कांबळे सर यांचेही अभिनंदन मुख्याध्यापकांनी केले.
तसेच यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील यांनीही अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.