आमदार.संजयमामा शिंदे यांना सर्वसामान्यांचा वाढता पाठींबा मिळत असुन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता संगठन बैठकांचे नियोजन करणार- ॲड. अजित विघ्ने
करमाळा(वार्ता)- करमाळा विधानसभा मतदारसंघात आमदार. संजयमामा शिंदे यांच्या संयमी व विकासप्रिय नेतृत्वाला सर्वसामान्य मतदारांची पसंती मिळताना दिसत आहे. मामांनी आमची कामे एका फोनवर तात्काळ समक्ष मार्गी लावली आहेत तसेच आमच्यासारख्या सर्वसामान्यांना आमदार साहेब सहजासहजी भेटतात , प्रत्येकाला मान सन्मान देतात अशा प्रतिक्रीया जनता जनार्दनांच्या असुन, करमाळा तालुक्यातील गलिच्छ आणि गटातटाच्या राजकारणाला कंटाळलेली सर्वसामान्य जनता मामांच्या पाठीशी कायम ऊभी राहणार आहे. याबाबत आता चर्चा होत आहे. या पार्श्वभुमीवरच गावोगावच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव गावोगावी कार्यकर्ता संगठन बैठकांचे नियोजन चालु असुन..प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय बैठका होणार असुन या बैठाकांमधुन कार्यकर्त्यांशी वार्तालाप, युवक संघटन, विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन केले जाणार आहे. याबाबतची माहिती आमदार समर्थक ॲड.अजित विघ्ने यांनी दिली आहे. तसेच राजकीय विरोधक व खरी जातीवादी मंडळी आमदार संजयमामा शिंदे यांचेवर चुकीचे पद्धतीने जातिवादाचे गलिच्छ आरोप मिडियाचे माध्यमातुन करीत आहे. खरे तर त्यांनी विकासकामांवर बोलले पाहिजे. निवडणुका जवळ आल्या की टिका टिप्पणी होतातच परंतु कोणीही खालच्या पातळीवर जाऊन कोणावरही टिकाटिप्पणी करू नये..याला करमाळा तालुक्यातील जनता कधीच भिक घालणार नाही. आमदार मामासाहेब जातियवादी नसुन विकासप्रिय लोकहितवादी नेतृत्व आहे. आणि जातियवादी कोण आहेत ते जनतेला चांगल माहीत आहे असेही वक्तव्य ॲड. अजित विघ्ने यांनी केले आहे.