कुर्डूवाडी प्रतिनिधी
संत शिरोमणी सावता महाराज यांच्या अरण, जिल्हा सोलापूर येथे जाताना कुर्डुवाडी शहरातील बेघर लोकांसाठी प्रधानमंञी आवास योजनेसंदर्भात चर्चाथे भक्त निवास वास्तुशिल्प भूमिपूजन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला कुर्डुवाडी शहरातुन आमचे नेते,गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंञी महाराष्ट्र राज्य अतुल सावे कुर्डुवाडी शहरात आले असता त्यांचे भाजपा पदाधिकारी यांचे वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी नाभिक समाजाच्या मागण्या संदर्भात तसेच कुर्डुवाडी शहरातील बेघर लोकांसाठी प्रधानमंञी आवास योजनेसंदर्भात चर्चा करुन निवेदन देण्यात आले.
यावेळी मंञी महोदयांनी दोन्ही विषयासंदर्भात शासकीय मिटींग आयोजीत करुन हे विषय लवकरच मार्गी लावु असे यावेळी सांगीतले.
यावेळी भारतीय जनता पार्टी माढा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष ऊमेश पाटील, भाजपा ग्रामीण सोलापुर जिल्हा कार्यकारणी चिटणीस, राष्ट्रीय नाभिक संघटना प्रदेश युवक अध्यक्ष सुधिर भाऊ गाडेकर, भाजपा युवा मोर्चा तालुका ऊपाध्यक्ष सागर तरंगे, राजेंद्र वाल्मीकी, भाजपा व्यापारी सेल माढा तालुका अध्यक्ष निलेश सुराणा, कुर्डुवाडी शहर अध्यक्ष बालाजी गायकवाड, शहरउपाध्यक्ष शार्दुल दातार, तेजस गाडेकर, औंदुबंर सुतार ऊपस्थित होते.