करमाळा प्रतिनिधी
साडे गावच्या विकासासाठी भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा व साखर संघाच्या संचालिका रश्मीदीदी बागल यांच्या नेतृत्वाखाली भरघोस निधी दिला जाईल. असे प्रतिपादन भाजपाचे सोलापूर जिल्हा युवा नेते व मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी आज केले. आज साडे ग्रामपंचायत उपसरपंचपदी बागल गटाच्या शिल्पा गणेश काशीद यांची बिनविरोध निवड झाली.
त्याबद्दल नवनिर्वाचित उपसरपंचांचा सत्कार बागल निवासस्थानी भाजपा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी गणेश काशीद, संजय ढवळे, शहाजी गोमे, संतोष वरडोळे, गोकुळ मोरे, संतोष कानडे, बाळासाहेब बदर, योगेश गोमे, गोरख बारकुंड,ज्ञानेश्वर सुपे,कालीदास वेदपाठट,दत्ता खराडे,बाजीराव माने आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बागल निवासस्थानी उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल दिग्विजय बागल यांनी अभिनंदन करून येत्या काळात रश्मी दिदी बागल यांना आमदार करण्यासाठी साडे गावच्या कार्यकर्त्यांनी एक विचारांन, एक दिलाने रश्मीदीदींच्या पाठीशी उभे राहावे गावाच्या विकासासाठी आम्ही स्वर्गीय लोकनेते दिगंबरमामा बागल यांच्या विचारातूनच गावांचा विकास करण्यासाठी निश्चितपणे कटिबद्ध आहोत असे सांगितले.