जेऊर बसस्थानकाच्या पुनर्बांधनी कामाचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे शुभहस्ते भुमिपुजन संपन्न..
आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांचे माध्यमातुन व माजी आ.नारायण आबा पाटील यांचे प्रयत्नातुन जेऊर बसस्थानकाच्या पुनर्बांधनीसाठी ३ कोटी ४२ लाख एवढा निधी उपलब्द झाला असुन या परिसरातील नागरीकांशी चर्चा करुन बसस्थानकाचे डिझाईन योग्य पद्धतीने बनवण्यासंदर्भात आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकार्यांना सुचना केल्या.
आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी या कामासाठी दि.१९/६/२०२३ रोजी
व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांना पत्र देऊन सोलापूर जिल्ह्यातील जेऊर, टेंभुर्णी व करकंब या तीन ठिकाणच्या बस स्थानकांच्या पुनर्बांधणी व आद्ययावतीकरन साठी प्रत्येकी २ कोटी रुपयांची मागणी केली होती त्यानुसार सर्व प्रशासकीय मंजुरी मिळून जेऊर व टेंभुर्णी बसस्थानकाच्या पुनर्बांधनी व नूतनीकरणसाठीनिधी उपलब्द झाला आहे.त्यानुसार जेऊर बसस्थानकाच्या पुनर्बंधनीसाठी ३ कोटी ४२ लाख रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेस दि.३१/५/२०२४ रोजी मंजुरी मिळाली आहे.त्याप्रमाणे या कामाचे भूमिपूजन जेऊर बसस्थानक येथे करण्यात आले, या निधीतून जेऊर बसस्थानकास नवीन बस इमारत,कम्पाउंड वॉल, पेव्हर ब्लॉक,वीज व सांडपाणी व्यवस्था इ. कामे केली जाणार आहेत.
यावेळी मा.जि.प.सदस्या सविताराजे भोसले,नवनाथ बापु झोळ,प.स.माजी सभापती अतुल पाटील,शेखर गाडे,शहाजीराव देशमुख,अदिनाथचे प्रशासकीय संचालक डाॅ.वसंत पुंडे,दिपक देशमुख,देवानंद बागल,मा.जि.सदस्य बिभिषण आवटे,धुळाभाऊ कोकरे,राजाभाऊ कदम,विकास गलांडे,दत्ता सरडे,अजित तळेकर,प्रवाशी संघटनेचे सुहास सुर्यवंशी,डाॅ.अमोल घाडगे,महेंद्र पाटील,बंडु माने,नितीन आढाव,अमरजित साळुंखे,संदिप मारकड,अमर ठोंबरे,रामेश्वर तळेकर,जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांचेसह परिसरातील मान्यवर नेतेमंडळी उपस्थित होती.
चौकट
अकलुज माळशिरस व नातेपुते येथील बसस्थानकाच्या कामासाठी आम्ही निधी उपलब्द केला होता परंतु आम्ही या बसस्थानकाचे बिओटी तत्वावर विस्तारीकरण करण्यासंदर्भात निर्णय घेवुन तसा प्रस्ताव दिला तो अंतिम टप्प्यात आहे.त्यामुळे अकलुज नातेपुते व माळशिरसचा निधी परत जावु नये यासाठी माढ्यातुन टेंभुर्णी,करकंब बस्थानकाचे नाव घेतल्यानंतर करमाळ्यातुन जेऊरचे नाव सुचवण्यासंदर्भात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आम्हाला विचारणा केली होती त्यानुसार आम्ही जेऊर बसस्थानकासाठी निधी उपलब्द व्हावा अशी मागणी केली होती. त्यानुसार जेऊर बसस्थानकासाठी निधी उपलब्द झाला आहे.
-नारायण आबा पाटील
(माजी आमदार करमाळा)