करमाळा प्रतिनिधी

कुगांव ता. करमाळा ते कळासी ता. इंदापूर दरम्यान दि. 21/5/2024 रोजी झालेल्या बोट अपघात ग्रस्त लोकांना महाराष्ट्र शासनाने त्वरित प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत दयावी अशी मागणी पश्चिम भागातील कर्तव्य दक्ष व आर टी आय कार्यकर्ता देविदास आप्पा साळुंके यांनी शासनास केली आहे. या प्रकरणाची मुखमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच तालुक्याचे लोक प्रतिनिधी आमदार, या भागाचे खासदार यांनी मुख्यमंत्री निधीतून मदत मिळविणेकामी सहकार्य करावे व दुर्घटना ग्रस्त लोकांना न्याय मिळऊन द्यावा अशी मागणी शासनास केली आहे असे साळुंके यांनी सांगितले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *