करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील मोरवड या गावातील वाड्यावस्त्या सह गावात गेल्या दोन महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. गेल्या वर्षी पाऊस पाणी भरपूर झाला होता तरीही या गावात नेहमीच एप्रिल मे महिन्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई
भासत असते. राजेंद्र मोहोळकर हे बागल गटाचे कट्टर समर्थक आहेत. मोहोळकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत गावांतील व वाड्यावस्त्यावरील नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा सुरू केला आहे. त्यांच्या या उपक्रमाबद्दल गावातून व परिसरातून कौतुक केले जात आहे.