देशात पुन्हा मोदी सरकारच- मतदारांचा ठाम विश्वास.. माढयातुन फिरसे रणजितदादा निंबाळकर यांनाच निवडून देण्याचे केले आवाहन- पश्चिम भागातील महायुतीच्या नेत्यांनी घेतल्या मतदारांच्या भावना जाणुन.
- करमाळा(वार्ताहर)- माढा लोकसभेसाठी चे महायुतीचे उमेदवार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तसेच महायुतीच्या प्रचारकांनी आता प्रचारात आघाडी मारल्याचे दिसत असुन आमदार. संजयमामा शिंदे यांनी तालुक्याचे प्रत्येक गावात यशस्वी दौरे करून कार्यकर्त्यामधे उत्साह निर्माण केला आहे. सध्या आमदार. संजयमामा शिंदे यांचा करमाळ्याच्या पुर्व भागात प्रचार चालु असतानाच पश्चिम भागातील मामा गटाच्या प्रमुख नेत्यांनी #मतदार भेट- चर्चा थेट # हा कार्यक्रम शनिवार व रविवार रोजी राबविण्याचे निश्चित करून आज शनिवार रोजी सकाळी ७:३० पासुन रात्री १० वाजेपर्यंत गावोगावी भेटी देऊन नागरिकांची मते जाणून घेत कमळालाच मतदान करणे बाबत प्रचार मोहीम राबविली आहे. या प्रचारा दरम्यान पश्चिम भागातील मामा गटाचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट सांगितले की खासदार व आमदारांनी मतदार संघात ठेवलेला संपर्क आणि केलेली विकासकामे तसेच भविष्यात मार्गी लावण्यात येणारी विकासकामे यावर भर देत विकासाचे बरोबर राहण्याला पसंती देत आमदार संजयमामा शिंदे सांगतील तेच धोरण राबविण्याचा संकल्प करत खासदार रणजितसिंह निबांळकराना निवडुन आणण्यासाठी चंग बांधला आहे. पश्चिम भागातील महत्वाचा दळवणाचा मार्ग रस्ता व डिकसळ पुल यासाठी नामदार अजितदादा पवार आणि आमदार संजयमामा शिंदे यांनी निधी मिळवून दिल्या मुळे मतदारांमधुन समाधान व्यक्त होत आहे. महिला बचत गटांना अल्पदराने कर्जवाटप करून लखपती दीदी सारखे उपक्रम शासनाने राबविल्याचे कौतुक होत आहे. मोदींनी आम्हाला मोफत शिलाई मशीन पासुन घरे, अन्नधान्य मोफत देण्याचे काम केल्याचे मतदारांतून बोलले जात आहे. शेतकऱ्यांना विम्याचे व दुष्काळ निधीचे वाटप डायरेक्ट खात्यात होत असल्याचेही समाधान लोक बोलून दाखवित आहेत. आमदार संजयमामा शिंदे यांची पश्चिम भागात एक भक्कम फळी तयार होत असुन यामधे विशेषतः सर्व उच्च विदया विभुषीत मंडळी आहेत. शेतकरी,डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, उदयोजक अशा मंडळींचा यात समावेश असुन विकासाचे व्हीजन घेऊन निघालेल्या या मंडळींना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचेच शासन येणार त्यामुळे आपला होणारा खासदार सुद्धा सत्तेत बसुन कामे करून घेणारा असावा अशी स्पष्ट भुमिका जनतेतुन ऐकायला मिळत आहे. करमाळ्यात सध्या महायुतीचे सर्वच नेते व कार्यकर्ते विविध भागात मतदारांशी संपर्क साधत असुन प्रचारात आघाडी घेतली असुन गावागावातून मोदींना म्हणजे कमळाला लीड देण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. सदर प्रचार दौऱ्यात सुर्यकांत पाटील( भाऊ), राजेद्रसिंह पाटील, बाळकृष्ण सोनवणे, मनोहर हंडाळ, राजाभाऊ धांडे , ॲड. नितीनराजे भोसले, प्रा. सुहास गलांडे, अजितदादा रंधवे,संतोष वारगड, डॉ. गोरख गुळवे, ॲड. अमित गिरंजे, ॲड. अजित विघ्ने, राजेंद्र बाबर, अनिल गलांडे,अर्जुनराव वारगड, विलासराव काळे पाटील, रावसाहेब काळे पाटील, नंदकुमार भोसले, वैगेरे नेतेमंडळी महायुतीचे प्रचारकामी मतदारांशी संवाद साधत आहेत.
*