जेआरडी माझा
सोलापुरातील लष्करमधील अश्विनी हॉस्पिटलसमोर असलेल्या श्री बिरोबा व महालिंगराया मंदिरासमोर उत्साहात यात्रा पार पडली.
श्री बिरोबा मंदिर विश्वस्तच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पालखी सोहळा, गजढोल, दीपोत्सव, हेडाम, धनगरी ओव्या इत्यादी कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विद्यमान आमदार व लोकसभेच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, नगरसेवक सुनील खटके, राधाकृष्ण पाटील, भारत कटारे, पोलीस निरीक्षक अजित लकडे, पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद, संस्कृती राम सातपुते, अमोल कारंडे, डॉ. अभिमन्यु टकले आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार प्रणितीताई शिंदे, बाळासाहेब शेळके, राधाकृष्ण पाटील आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला संस्थेचे रमेश तरंगे, चंद्रकांत वाघमोडे, नामदेव पुकाळे, शेखर बंगाळे, संतोष नरोटे, महादेव काकडे, महादेव कटारे, निमिषा वाघमोडे, संभाजी गावडे, श्रीराम पाटील, मुख्याध्यापिका गितांजली कटारे, अण्णप्पा सतुबर, उज्ज्वलकुमार माने, डॉ. दौला ठेंगील, डॉ. कुंभार, भगवान बनसोडे, उमेश मुळेवाडी, भुताळी घोडके, गुरुभाऊ कावडे, सिद्राम वाघमोडे आदी उपस्थित होते. यावेळी भाविकांना संयोजकांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आले.
या देवस्थानसाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी वॉल कंपाऊंडसाठी 2021 साली 18 लाख 31 हजार रुपये निधी दिल्याबद्दल मुख्याध्यापिका गितांजली भारत कटारे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बनसोडे यांनी केले.