सोलापूर दि.27 (जिमाका) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 सोलापूर जिल्हा, माढा 43 लोकसभा अनुषंगाने दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी पंतप्रधान भारत सरकार यांचा दौरा व सभा माळशिरस येथे आहे. नियोजीत दौरा व सभेकरीता सोलापूर, सातारा व पुणे जिल्हयातील विविध तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणावर नागरीक येण्याची शक्यता असल्याने दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी माळशिरस येथील वाहतुक मार्गात बदल करण्यात आलेला आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी निर्गमित केले आहेत.
पंतप्रधान भारत सरकार यांचे सुरक्षिततेच्या कारणास्तव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 सी वरील अकलूज ते माळशिरस दरम्यान जाणारे व येणारे सर्व वाहनांना (अत्यावशक सेवा, परवानगी दिलेली वाहने व सभेकरीता येणारी लहान वाहने वगळून) दिनांक 30 एप्रिल 2024 रोजीचे 06 :00 ते 15:00 वाजेपर्यंत पथक्रमण करण्यास मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- पुणे, नातेपूते कडून अकलूज कडे येणारी वाहने बायपास रोडने यादव पेट्रोलपंप, पाणीव पाटी मार्गे अकलूज, इंदापूर, टेंभूर्णी या मार्गाचा वापर करावा. तर अकलूज कडून माळशिरस कडे येणारी वाहने अकलूज येथून पाणीव पाटी मार्गे बायपास रोडने नातेपूते पुणेकडे या मार्गाचा वापर करावा.
पोलीस, रुग्णसेवा, अग्निशमन दलाची वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने, परवानगी दिलेली वाहने व सभेकरीता येणा-या लहान वाहनांना लागू राहणार नाहीत. असेही जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी आदेशात नमूद केले आहे.