करमाळा प्रतिनिधी
लोकसभेच्या निवडणुकीत देशपातळीवर पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्षम नेतृत्वाखाली सरकार येणार आहे. त्यामुळे आपल्या माढा लोकसभेचा खासदार सत्ते सोबत बसणारा पाठवायचा आहे. खासदार रणजितसिंह नाईक
निंबाळकर यांच्या कामाची पद्धत अतिशय चांगली असुन ते एक व्हीजन असणारे नेतृत्व आहे. मतदार संघातील सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावण्याचे त्यांचे धोरण वाखाणण्यासारखे आहे. आमच्या तालुक्यातील केम, जेऊर सह पारेवाडी रेल्वे
स्थानकावर एक्सप्रेस गाडयांना थांबा देण्याचे वचन त्यांनी पुर्ण केले आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी राहुन उर्वरीत असणारी कामे आपणास करून घ्यायची आहेत. संपूर्ण देशात मोदी सरकारने केलेले रस्त्यांचे जाळे, आरोग्या बाबत दिलेला निधी,
महिला बचत गटाचे माध्यमातून महीला सबलीकरण, मोफत अन्नधान्य वाटप, शेतकरी वर्गाला दुष्काळ निधीसह प्रत्येक स्किमचा अनुदान लाभ देण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीने केलेल्या विकासाची कामे गोरगरीब सर्वसामान्यांच्या हिताची आहेत. ही देशाची निवडणुक आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हेच सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे आपला खासदार सत्तेत बसणाराच पाठवला तर निश्चितपणे विकासाचा वेग वाढणार आहे. आपण चुकीची माणसे निवडून दिली तर पाच पाच वर्ष विकास खुंटला जाईल. त्यामुळे माढा लोकसभेतून पुन्हा एकदा आपण रणजितदादा निंबाळकर यांनाच निवडून द्यावे असे आवाहान शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुर्यकांत भाऊ पाटील यांनी केले आहे.