जेआरडी माझा
शेती महामंडळ कामगारांना दोन गुंठे जागा व घरे बांधून देण्यासाठी शासनाने 2009 यावर्षी काढलेल्या आदेशाप्रमाणे 99 कोटी 50 लाख रुपये देय रक्कम देण्यात यावी तसेच ईपीएस पेन्शन धारकांना पेन्शनवाढ़ देण्यात यावी याकरिता शेती महामंडळ
कामगार संघटना पदाधिकारी व पेन्शनधारक संघटना पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सदाशिव लोखंडे यांना शिर्डी येथे 26 एप्रिल रोजी भेटले. मुख्यमंत्री यांनी शेती महामंडळ कामगारांना
दोन गुंठे जागा देण्यात यावी देय रक्कमेची तपासणी करून ती देण्याबाबत चे आश्वासन दिले. आजच्या शिष्टमंडळामध्ये कामगार नेते सुभाष कुलकर्णी, वेणूनाथ बोळींज,चांगदेव गायकवाड, बी. आर. चेडे, प्रकाश ठाकरे, बाबूलाल पठाण, रमेश देसाई, संतोष आहिरे, कारभारी बत्तीशे, आदी उपस्थित होते.