करमाळा प्रतिनिधी
मांगी येथील कानवळा नदीवरील पुलावर टिप्पर मधून पडलेला गाळ साचून पाऊस पडल्याने रस्ता खुप निसरडा झालेला आहे. मागील अर्ध्या तासापासून दहा ते बारा मोटार सायकल व इतर गाड्या घसरून पडलेल्या आहेत. त्वरित उपाययोजना करून खबरदारी घेणे गरजेचे आहे. अशी मागणी रहीवाश्यांकडून केली जात आहे