करमाळा प्रतिनिधी
भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आर.पी.आय. चा पाठिंबा द्यायचा का नाही यासंदर्भात लवकरच नियोजन बैठक घेणार असल्याची माहिती आर.पी.आय. चे माजी जिल्हाध्यक्ष तथा आदिनाथचे माजी व्हाईस चेअरमन रमेश कांबळे यांनी दिली आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्याशी तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी चर्चा करणार आहे. त्यानंतर आम्ही सर्वजण ठरविणार आहे की, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सहकार्य करायचे की नाही. कारण गेली पाच
वर्ष निंबाळकर यांनी फक्त भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडे लक्ष दिले कुठलाही मित्र पक्षाकडे व आर.पी.आय. च्या कार्यकर्त्याकडे लक्ष दिले नाही. आवश्यक ते सहकार्य केले नाही. गाव पातळीवर विविध योजनांचा लाभ मिळवून दिला नाही.
यामुळे आरपीआयची सर्व तालुका जिल्हा पदाधिकारी नाराज आहे. याबाबत आठवले यांच्यापुढे आम्ही आमचे म्हणणे मांडणार आहे. त्यानंतरच निंबाळकर यांना सहकार्य करायचे की नाही ते ठरविणार आहे असेही अखेर कांबळे यांनी सांगितले आहे.