करमाळा प्रतिनिधी
यशवंत लिंबराज ढेरे या प्रवाशाची हरवलेली बॅग करमाळा बस स्थानकाचे नियंत्रण प्रमुख संतोष साने यांनी दिली आहे.
ढेरे यांच्या बॅगेत दहा हजार रुपये होते व इतर महत्वाचे कागदपत्रे होते. शनिवारी ढेरे हे प्रवासी कव्हे त्यांच्या गावी निघाले होते. त्या प्रसंगी बस स्थानकावर बँग विसरली होती. एका प्रामाणिक प्रवाशाने ती बॅग कंट्रोलर संतोष साने यांच्याकडे दिली.
संबंधित प्रवाशाचा प्रामाणिकपणा व कंट्रोलर संतोष साने यांच्या सतर्कतेमुळे ढेरे यांना यांची बँग मिळाल्याबद्दल त्यांनी साने यांचा सत्कार केला व आभार व्यक्त केले.