![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2024/02/WhatsApp-Image-2024-02-28-at-20.18.021.jpeg)
करमाळा प्रतिनिधी
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर संबंधित प्रशासकीय अधिकारी संचालकांनी भ्रष्टाचार केला आहे. याबाबत कायदेशीर चौकशी करावी अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख देवानंद बागल यांनी केली आहे.
![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2024/02/isha-1024x1024.jpeg)
बाळासाहेब बेंद्रे हे अधिकारी महिन्यातून दोनदा येतात गाडीचे प्रति महिना भाडे 45 हजार लावत आहे. प्रशासकीय संचालक ही काही गोष्टीत त्यांना साथ देत आहे. काही दिवसापूर्वीच वाहने, ट्रक, टँक्टर, गाड्या त्यांनी इंदापूर येथील व्यापाऱ्याला भंगारात तोडून विकले आहेत. सुरक्षा विभाग व शेती विभाग यांच्याकडेच याबाबतचे दप्तर आहे. कारखान्याकडे अजून नोंद नाही.
![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2023/10/shivm3-1024x309.jpeg)
भावनगर येथून इलेक्ट्रिक सामान खरेदी केले आहे. जुन्या मोटारी आहेत त्यांना कलर दिला आहे व इतर साहित्य अंदाजे किंमत दोन ते तीन लाख रुपये आहे. त्याचे बिल 13 ते 14 लाख रुपये त्यांनी काढले आहे. जुन्या कर्मचाऱ्यांना 50 टक्के पगारीवर घरी बसविले आहे.तर नवीन 30 ते 40 कर्मचारी भरती केले आहे. वास्तविक पाहता या कर्मचाऱ्यांची काही गरज नव्हती चार महिने खालीच सुरक्षा रक्षकालाच एमडीची जबाबदारी दिली आहे चुकीचे आहे कसा कारभार होणार ही मोठी
![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2023/12/2-guntha-plot.jpeg)
शोकांतिका आहे. माँलेसेसचा रेट दहा हजार आहे त्यांनी आठ हजार आठशे ने ऑर्डर काढली आहे. असे अनेक भ्रष्टाचार सध्या कारखान्यावर चालू आहे. कारखाना परिसरातील कर्मचारी राहत आहे. वीज बिल भरले नाही विज कट केली आहे. तेथील कर्मचाऱ्यांच्या मुलांचे दहावी बारावीची परीक्षा चालू आहे. विज कट केल्यामुळे त्यांना अभ्यास करणे मुश्किल झाले आहे. वीज भरले असते तर चांगले झाले असते त्यांनी 16 लाख रुपयांचे डिझेल जाळले आहे असे अनेक प्रकार कारखान्यावर घडत आहे.
![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2023/05/jrd-जाहिरात.jpeg)
याबाबत बाळासाहेब बेंद्रे, महेश चिवटे ,संजय गुटाळ यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख देवानंद बागल यांनी सहकार मंत्री यांच्याकडे केली आहे
या संदर्भात प्रशासकीय संचालक महेश चिवटे यांना फोन लावला असता त्यांनी फोन उचलला नाही
देवानंद बागल यांनी राजकीय दृष्ट्या चुकीचे सांगितले आहे.कुठलेही वाहने अथवा भंगार विकले नाही एक रूपयांचे ही बिले काढले नाही 24 लाख रुपये कारखाना स्थळावरील वीज बिल भरले आहे त्यांचे राजकीय सहकारी यांनी राजकारण केले व लगेच वीज कट केली आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अध्यक्ष आहे त्यांनाच सांगा वीज कनेक्शन देण्यासाठी.काही जुने कर्मचारी सोडून गेले त्या ठिकाणी काम करण्यासाठी आवश्यक नवीन कर्मचारी भरणे आवश्यक होते – संजय गुटाळ, संचालक