करमाळा प्रतिनिधी
देवळाली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैद्य वस्ती येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे विविध प्रयोग व प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अंनिसचे
कार्याध्यक्ष अनिल माने यांनी अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी नारळातून रिबीन काढणे, विनावातीचा दिवा पाण्याने पेटवणे, भूत गडूमध्ये बांधणे, तोंडामध्ये जळता कापूर टाकणे यासह इतर अनेक
प्रात्यक्षिके करून दाखविली. तसेच समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरा व विद्यार्थ्यांमध्ये असलेली भूतांची भीती नाहीशी करून मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागेल अशा प्रकारे मार्गदर्शन केले. यावेळी वस्तीवरील महिला व पालक वर्गाची विशेष उपस्थिती होती.
यावेळी सोलापूर जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य संजय हंडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या साधना दामोदरे, रंजना वाघमोडे, प्रियंका पडवळे, काजल धोत्रे, निकिता धनवे, पार्वती चव्हाण, श्रावणी सुरवसे, आरोग्य सेविका साळवे मॅडम, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक शांतीलाल खाडे यांनी तर आभार मुख्याध्यापिका प्रफुल्लता सातपुते यांनी मानले.