करमाळा प्रतिनिधी

12डिसेंबर रोजी मा.आमदार, संस्थेचे अध्यक्ष जयवंतरावजी जगताप व विश्वस्त शंभूराजे जयवंतराव जगताप यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्त महात्मा गांधी विद्यालय करमाळा आयोजित तालुकास्तरीय आंतरशालेय भव्य डान्स स्पर्धेमध्ये

नगरपरिषद मुला मुलींची शाळा नंबर 4 करमाळा या शाळेने लहान गटामध्ये ग्रुप डान्स स्पर्धेमध्ये मध्ये तृतीय क्रमांक पटकावला त्याबद्दल प्रमाणपत्र व चषक देऊन शाळेचे विद्यार्थी, मुख्याध्यापिका टांगडे मॅडम, माने सर, भोसले मॅडम, मुसळे

सर, दुधे गुरुजी यांना गौरविण्यात आले. त्याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी पाटील, विस्तार अधिकारी निळ, संस्थेचे विश्वस्त शंभूराजे जगताप व शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. या यशाबद्दल करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी

बालाजी लोंढे, नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी अनिलजी बनसोडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादासाहेब इंदलकर व सर्व सदस्य, न.प. शिक्षण मंडळाचे केंद्र समन्वयक दयानंद चौधरी सर यांनी विजयी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *