कोर्टी प्रतिनिधी
करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी मागील वर्षात कोर्टी गावातील नागरिकांनी जी जी कामे मागितली त्यातील बहुतांश कामी मार्गी लागली आहेत. त्यामध्ये गेली २५ वर्षांपासून रखडलेले कुकडी पोंधवडी चारीचे काम, आवाटी ते
कोर्टी हमरस्त्याचे काम वेळेत पूर्ण करणे, गोरेवाडी प्रा. शाळा नवीन खोली, हवालदार वस्ती मारुती मंदिर सभामंडप, कुस्करवाडी रस्त्याचे काम, मागणी प्रमाणे सीडी वर्क, गोरेवाडी जुन्या तलाव दुरुस्ती इ.कामे एका वर्षात मार्गी लागली
असल्याचे मत प्रा. संजय जाधव मा. उपसभापती यांनी व्यक्त केले. ते जुन्या तलावाच्या दुरुस्तीचे कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने आमदार संजय मामा यांचे कार्य तत्परतेबद्दल जाधव यांनी विशेष आभार मानले.
यावेळी एन.आर. भुजबळ सर मा.मुख्याध्यापक, निलकंठ तात्या अभंग, विलास धुमाळ चेअरमन वि.का.सोसायटी, सुभाष आबा अभंग, श्रीरंग मेहेर सरपंच प्रतिनिधी कोर्टी, प्रवीण चव्हाण सदस्य ग्रामपंचायत, संजू आबा जाधव सदस्य ग्रामपंचायत,
लक्ष्मण अनारसे, सागर अभंग, जगताप ग्रामविकास अधिकारी कोर्टी, सुनील काका शिंदे, शहाजी धुमाळ, हनुमंत जाधव मेजर, रंगनाथ अनारसे, पोपट गोरे, विकास गावडे, देविदास अभंग, दत्ता ठोंबरे, बाळासाहेब पारखे, गोरख शिंदे, बापू शिंदे, विकास
गावडे, सचिन जाधव, वैभव जाधव, अंकुश अभंग, भानुदास अभंग, विश्वंभर काळे, बबनराव जाधव, प्रमोद जाधव, नागेश जाधव, सुनील जाधव, तेजस देमुंडे, सचिन नवले, संदीप गावडे, मंगेश अभंग उपस्थित होते.