करमाळा प्रतिनिधी
21 जानेवारी रोजी पुणे येथे झालेल्या ऑरिस्टो किड्स आयोजित अबॅकस व वैदिक मॅच आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी 4000 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या परीक्षेसाठी श्रीलंका अमेरिका येथून विद्यार्थी पुणे येथे आलेले होते. राज्यातून
जिल्ह्यातून विद्यार्थी तेथे परीक्षेसाठी सहभागी होते. करमाळा मुथा अबॅकस अकॅडमी मधून एकूण शंभर विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना चार ते पाच मिनिटात 75 गणिते अचूक सोडवणे अनिवार्य होते. आपल्या करमाळा
अकॅडमी मधून वीस विद्यार्थ्यांनी पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक मिळवण्याचे मानांकन मिळाले आहे व पूर्ण गणिते अचूक सोडवून फक्त एक ते दीड मिनिटाचा वेळ जास्त लागलेले विद्यार्थी आपल्या क्लास मधून 60 विद्यार्थी आहेत. या
विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय चौथा क्रमांक हा अवॉर्ड मिळालेला आहे. 14 जानेवारी रोजी ऑनलाइन ग्रँड चॅम्पियन या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना पाच मिनिटात शंभर गणिते सोडवणे कंपल्सरी होते. या परीक्षेत जातेगाव येथील शौर्य दीपक वारे
याने सब ज्युनियर कॅटेगरीत पाच मिनिटात 93 गणिते सोडवून तिसरा क्रमांक मिळवलेला आहे व करमाळ्यामधील काव्या अभिजीत कटारिया या विद्यार्थिनीने फर्स्ट लेवल मध्ये पाच मिनिटात 97 गणिते सोडवून थर्ड रँक मिळवलेला आहे. या
परीक्षेसाठी प्रमुख पाहुणे मॅनेजिंग डायरेक्टर उज्वल पांडा सर व सामाजिक कार्यकर्त्या पुणे येथील आदिती निकम, अबॅकस ट्रेनर सुरेखा मामीदवार, प्राजक्ता पंडारे या सर्वांच्या उपस्थित बक्षीस वितरण पार पडले सर्व अरिस्टो किड्स शिक्षकांनाही सन्मानचिन्ह देण्यात आले. करमाळा येथील मोठा अभ्यास अकॅडमी ला एकूण 74 बक्षिसे मिळालेली आहेत. त्यामुळे या अकॅडमीचा स्पेशल गौरव तेथे करण्यात आला व संस्थापिका ज्योती मुथा मॅडम यांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.