करमाळा प्रतिनिधी

आदिनाथ सहकारी साखर कारखाना प्रचंड अडचणीत असताना व त्याचबरोबर मकाई सहकारी साखर कारखान्याची शेतकऱ्यांचे पैसे थकीत झाले असताना शुक्रवारी पहाटे चार वाजता दिग्विजय बागल व रश्मी बागल यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर जाऊन आदिनाथ महाराजांची कारखाना स्थळावरील मंदिरात पूजा केली.

पहाटे चार वाजता केलेल्या पूजेदरम्यान कारखान्यातील काही कर्मचारी उपस्थित होते. अचानक पहाटे येऊन आदिनाथ कारखान्यावर बागल बंधू भगिनींनी आदिनाथ महाराजांची का पूजा केली ? यावर तालुक्यात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

शुक्रवारी पहाटे आदिनाथ महाराजांची पूजा केल्यानंतर शनिवारी दुपारी आदिनाथ कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी आदिनाथ कारखाना बंद करण्याची हत्यार उपसल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. आदिनाथ कारखान्याचे जवळपास सहा हजार टन

उसाचे गाळप झाले असून याचा ज्यूस कारखान्यातच आहे. पगार केल्याशिवाय काम करणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्यामुळे हा ज्यूस वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शिवाय मशिनरी नादुरुस्त होऊन सात ते आठ कोटी रुपयांची

नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. आदिनाथ कारखान्यातील कुरगुडीच्या राजकारणामुळे सातत्याने आदिनाथ ची कोट्यावधी रुपयाची नुकसान झालेली आत्तापर्यंत इतिहास आहे. चार वर्षांपूर्वी आदिनाथ मधील साखर विक्रीस कर्मचाऱ्यांनी विरोध केल्यामुळे या साखरेवरील विनाकारण 46 कोटी रुपये व्याज कारखान्याला भरावे लागल्यामुळे कारखाना दिवाळखोरीत

निघून त्याचा भाडेतत्त्वावर लिलाव निघाला होता. कर्मचाऱ्यांनी संपाची भूमिका व काम बंद इशारा दिल्यानंतर प्रशासक मंडळाकडून कुठलीही प्रतिक्रिया येत नसल्यामुळे कारखान्याचे भवितव्य काय अशी चर्चा सुरू आहे.

शुक्रवारी पहाटे बागल बंधू भगिनींनी आदिनाथ कारखान्यावर येऊन आदिनाथ ची केलेली पूजा व काही कर्मचाऱ्यांची केलेली चर्चा याचे पडसाद तालुक्यात उमटत आहेत. सुंदरदास पोळ यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी एकत्रित येत असल्याचे चित्र दिसून येत आहेत.

….

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची उज्वल भवितव्य करण्यात स्वर्गीय दिगंबरराव बागल यांचा सिंहाचा वाटा असून स्वर्गीय दिगंबर बागल यांच्या काळातच आदिनाथ कारखाना कर्जमुक्त झाला होता. त्यांचे वारसदार रश्मी दिगंबरराव बागल व दिग्विजय दिगंबरराव बागल यांच्या बद्दल आम्हाला आदर आहे. रश्मी बागल यांनी आम्हाला आदिनाथ कारखान्यावर येत आहोत असे सांगितले असते तर आम्ही त्यांच्या स्वागताला थांबलो असतो. पण अचानक पहाटे येऊन पूजा करून जाण्यामुळे विनाकारण सभासदास संभ्रम निर्माण होत आहे अशी प्रतिक्रिया प्रशासकीय संचालक महेश चिवटे यांनी दिली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *