
पैगंबर जयंती व महात्मा गांधी जयंती निमित्त उर्दू शाळेत खाऊ वाटप
करमाळा प्रतिनिधी

करमाळा मुस्लिम समाजाच्या वतीने आज कै. नामदेवराव जगताप उर्दू शाळेत पैगंबर जयंती व महात्मा गांधी जयंती निमित्त नगरसेवक संजय सावंत व ओ. बी. सी. ऑर्गनायजन चे अध्यक्ष अमीरशेठ ताबोंळी यांच्या शुभहस्ते शेरणी प्रसाद वाटप

करण्यात आले. यावेळी शिवकुमार चिवटे, करमाळा अर्बन बॅकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार, मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष हाजी फारुक बेग, हाजी कदीरभाई शेख, आलीम खान, नागेश उबाळे, आनंद रोडे, राजु नालबंद, वाजीद शेख, समीर वस्ताद, हारून वस्ताद, फैयाज पठान आदी जण उपस्थित होते.
