घारगाव येथील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन अध्यक्ष उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड

करमाळा प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव येथे शाळेत पालक सभा उत्सवात  संपन्न झाली. या सभेसाठी सरपंच, माजी सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष ,उपाध्यक्ष, चेअरमन, मुख्याध्यापक तसेच ग्रामस्थ पालक, शिक्षक उपस्थित होते.

आजच्या पालक सभेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती पुन्हा स्थापन करण्यात आली. उपस्थित पालकांमधून अमोल उत्तम सरवदे यांची अध्यक्ष व किसन बन्सीलाल पवार यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सदस्य पदी बिभीषण बारस्कर, श्रीराम गोसावी, वैशाली राजाराम पवार, शबाना दादमिया शेख, संतोष गायकवाड, सोनाली पोपट गायकवाड, मंदाकिनी धनंजय काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा शाळेतील शिक्षकांच्या हस्ते

श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

शाळेचे मुख्याध्यापक यांनी सर्व नूतन सदस्यांना शाळा व्यवस्थापन समितीची कर्तव्य आणि जबाबदारी याबाबत माहिती दिली. तसेच सरपंच लक्ष्मी संजय सरवदे यांनी सर्व सदस्यांचे अभिनंदन करून सर्वांना शाळेच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. शिक्षक वर्गांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खान सर यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *