
करमाळा प्रतिनिधी
पुणे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्षपदी हाजी उस्मानशेठ तांबोळी यांची निवड झाली आहे.
हाजी उस्मान शेख तांबोळी हे पहिलेही पुणे जिल्हा उपाध्यक्ष होते. तसेच करमाळा व महाराष्ट्र मुस्लिम समाजाचे ते अध्यक्ष

आहेत. त्यांचे सामाजिक काम मोठे असल्यामुळे तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर त्यांना मानत आहेत. त्यांच्या कामामुळे पुन्हा त्यांना पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर पुणे व करमाळा येथील पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

